हौसे -गवसे इच्छुक झाले परेशान

Foto
औरंगाबाद :  महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच गेल्या महिनाभरापासून सर्वच पक्षातील हौसे, गवसे इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी जुगाड शोधणे सुरू केले होते. वॉर्डात कधीही न फिरकणार्‍या मंडळींचे नागरिकांना रोजच्या रोज दर्शन होऊ लागले होते. ‘ निवडणूक कार्यकर्ते’ तर ‘दात घासून’ तयारीला लागल्याचे चित्र होते. असे सर्व बहरलेले वातावरण असताना अचानक चीनमधून ‘कोरोना’ आला आणि मनपा निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे ‘निवडणूक फिवर’ टिकवायचा कसा आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ‘निवडणूक कार्यकर्ते’ सांभाळायचे कसे या प्रश्‍नामुळे इच्छुकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या  सुरुवाती पासून शहरात  महापालिका निवडणुकीचे  वारे  वाहू लागले होते. 2015 मध्ये जे कार्यकर्ते होते ते आता नेते व इच्छूक उमेदवार झाले आहे. आपलेच  कार्यकर्ते आपल्या समोर उभे ठाकल्याने नगरसेवकांचे  चांगलेच धाबे दणाणले.नवीन कार्यकर्त्यांची जमवा जमव करताना  नाकेनऊ येत होते. गेल्या महिन्या भरात इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरण्या पासून ते गल्लोगल्ली प्रचारावर हजारो रुपय खर्च केले. काही प्रमुख पक्षाच्या हायकमांड व पदाधिकार्‍यांशी तिकीट  मिळावे म्हणून सेटिंग ही केली होती.पक्ष नेत्यांच्या शहर आगमन साठी पोस्टर बॅनरवर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आले आहे.कार्यकर्त्यांना प्रचारासाठी दररोज रात्रीच्या ढाब्या वरील पार्ट्या, गाड्या मध्ये पेट्रोल -डिझेलचा खर्च ही सुरु होता. घर- घर गाठी भेटी, लग्न, मुंजाचे समारंभ असा दररोजचा व्यस्त कार्यक्रम होता. वॉर्डातील लोकांच्या अडीअडचणीं दूर करण्यात येत होत्या.आता मध्येच चीनच्या कोरोनामुळे निवडणूक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे इच्छुकांसमोर मोठ्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत.                        
कोरोनाच्या  कहरमुळे गेल्या आठ दिवसापासून निवडणूक होणार कि पुढे  ढकलली जाणार या विषयी चर्चा सुरु होती.  एमआयएमचे खा. इम्तियाज जलील  व  महापौर नंदकुमार घोडेले यांनी थेट  राज्य शासन व आयोगाकडे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. राज्यात  दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या  चिंतेचा विषय असल्याने शासनाने आयोगा कडे निवडणूक  तीन महिने  पुढे  ढकलण्याची  शिफारस केली आहे. शासनाच्या  शिफारसीला ग्रीन सिग्नल मिळणार हे  निश्‍चितच  आहे.
दरम्यान  निवडणूक  पुढे गेल्याने राजकीय नेत्यां बरोबरच  हौसे गवसे  इच्छूकांना खर्चाचा ताळमेळ  कसा बसवावा? ही चिंता सतावत आहे पुढचे तीन महिन्याचा अतिरिक्त  खर्च साठी पैशाची जमवा जमवी बरोबरच  कार्यकर्त्यांना  सांभाळणे हे इच्छूकां साठी  तारेवरची  कसरत आहे. आरक्षण ते वार्ड रचना, आक्षेप, मतदारांच्या याद्या काढणे तसेच वॉर्डाचे  नकाशा साठी इच्छूकांनी हजारो रुपय खर्च केलं आहे. मोठया पक्षांच्या काही गब्बर  इच्छूक तसेच महापालिकेत गेली दोन तीन टर्म पूर्ण करणार्‍यांना काही फरक  पडणार नाही. नगरसेवक असतांना त्यांनी मोठी माया जमा केली. खरं आवाहन नवीन हौस्या गवस्यां समोर आहे. काही  इच्छूकांनी  निवडणुकी साठी चक्क आपल्या मालमत्ता  विकल्याचे तर काहींनी आपले राहते घर विकून टाकले. एकूणच वार्डात आपला दबदबा कायम ठेवण्या साठी या इच्छूकांना बरीच  मोठी आर्थिक कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे या खर्चाची बेगमी कशी करावी, हा प्रश्‍न त्यांच्यासमो निर्माण झाला आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker